आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांचा पुढाकार आवश्यक – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन


भिगवण, प्रतिनिधी : सागर जगदाळे

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर; बावडा येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय तसेच इंदापूर महाविद्यालयाचा कनिष्ठ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष शिबिराचे आयोजन दि. 09/01/2026 ते 15/01/2026 या कालावधीत नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे करण्यात आले आहे.

 

या विशेष शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने संपन्न झाले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या “मी नाही, आम्ही” या ब्रीदवाक्याचा अर्थ स्पष्ट करत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी स्वयंप्रेरणेने पुढे येण्याची गरज अधोरेखित केली. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, शिस्त व सेवाभाव निर्माण करणारी प्रभावी चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता समाजाशी नाते जोडणारे असावे, असे सांगून शिबिरामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो व सामाजिक समस्यांचे भान येते, हेच खरे शिक्षण असल्याचे स्पष्ट केले.

 

यावेळी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी, संचालक विलासबापू वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय कुंभार, इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य दत्तात्रय गोळे, बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे तसेच भोडणी गावच्या सरपंच राधिका प्रशांत गोसावी उपस्थित होत्या.

 

या विशेष शिबिराच्या कालावधीत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पाणी बचत जनजागृती, आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक जनजागरण, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामभेट, सर्वेक्षण, प्रभातफेरी, श्रमदान व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमाधिकारी डॉ. उत्तम माने यांनी शिबिराचा उद्देश, नियोजन व आगामी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी समाजसेवेची शपथ घेऊन जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. उत्तम माने, प्रा. महम्मद मुलाणी, प्रा. प्रशांत साठे, प्रा. अमोल मगर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले, तर आभार डॉ. लहू वावरे यांनी मानले. प्रा. स्वाती राऊत यांनी महाविद्यालय व राष्ट्रगीत सादर केले.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!