आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

वेल्हा-राजगडमध्ये वंचित-आरपीआय (आठवले) युतीचे रणशिंग उमेदवारांची घोषणा; निवडणुकीच्या रिंगणात ‘तिसरा पर्याय’ मजबूत


प्रतिनिधी : समीर कांबळे

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वेल्हे-राजगड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज वेल्हे येथील ‘हिल टॉप रिसॉर्ट’ येथे वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी युतीची अधिकृत घोषणा करत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

युतीच्या माध्यमातून वेल्हे-राजगड तालुक्यातील विविध गट-गणांमध्ये संघटनात्मक ताकद वाढवून निवडणुकीत प्रभावीपणे उतरायचे उद्दिष्ट असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. स्थानिक पातळीवर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच वंचित, शोषित आणि सामान्य घटकांना न्याय देण्यासाठी ही युती भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

निश्चित झालेले उमेदवार

बैठकीत निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या प्रमुख उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली—

विंझर-पानशेत गट : अमोल देवगिरीकर

विंझर गण : प्रदीप कांबळे (खुला प्रवर्ग)

पानशेत गण : अमिषा संतोष गायकवाड (सर्वसाधारण महिला)

वांगणी-वेल्हा गट : रामभाऊ मरगळे (ओबीसी पुरुष)

वांगणी गण : दिलीप रणखांबे

वेल्हा गण : ओबीसी महिला जागेसाठी ४ उमेदवार इच्छुक असून त्यांच्या नावावर छाननी व चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या बैठकीला वंचित बहुजन आघाडी व आरपीआयचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हा निरीक्षक उत्तमदादा वनशिव, जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ लोखंडे, जिल्हा प्रवक्ते महेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष महादेवदादा खाटपे, सुनील कांबळे, सरचिटणीस अरुण कांबळे, रामभाऊ मरगळे, रामभाऊ इंगळे यांचा समावेश होता.

तसेच वेल्हे तालुकाध्यक्ष बापू शिंदे (वंचित), कुंदन गंगावणे (तालुकाध्यक्ष आरपीआय), आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. विश्वनाथ गायकवाड, विलास गायकवाड, विठ्ठल गायकवाड, अमित शिंदे, संतोष गायकवाड, सुरेशदादा गायकवाड, सुजल शिंदे, अमीर शेख (उपाध्यक्ष), सुरेश रणखांबे, अंकुश गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, बाजीराव रणखांबे आणि विंझरचे उपसरपंच संतोष गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

“जनतेचा कौल आमच्या बाजूने असेल”

बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विकासकामे, मूलभूत सुविधा, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करत युतीची भूमिका मांडली.

“तालुक्यातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय देण्यासाठी ही युती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार असून सर्वसामान्य जनतेचा कौल आमच्या बाजूने असेल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीनंतर वेल्हे-राजगड तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिकच तापणार असून, युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची पुढील रणनीती लवकरच जाहीर होणार असल्याचेही संकेत देण्यात आले


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!