प्रतिनिधी: शशिकांत जाधव पानशेत
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यालय, खानापूर येथील विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सारदा मठ, पुणे यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत सन्मान मिळवला.
या स्पर्धेत माध्यमिक विभागातून संतोषी राऊत, ज्योती केंद्रे तसेच उच्च माध्यमिक विभागातून प्रियंका कोकरे, अनुष्का जोरकर, श्रुती नवघणे, प्रियंका मरगळे, सुरेखा डिगडे आणि गौरी कदम या विद्यार्थिनींचा समावेश होता. या यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मान सारदा मठाच्या अध्यक्षा प्रशांतजी माता यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास विद्यालयातर्फे ज्येष्ठ शिक्षिका ज्योत्स्ना गुरव, नीलम करंजे तसेच माजी शिक्षक व माजी विद्यार्थी संघाचे सल्लागार सदस्य शशिकांत जाधव उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक शिवराम साबळे आणि माजी विद्यार्थी संघाचे सल्लागार सदस्य, सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत जाधव यांनी विशेष अभिनंदन केले.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.







