आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

केळद येथे विजेचा धक्का लागून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान


राजगड (प्रतिनिधी) : समीर कांबळे

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील केळद येथे दुर्दैवी घटना घडली असून, तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून बैलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी शंकर यशवंत शिंदे यांनी आपल्या जनावरांना जननी माता मंदिर परिसरातील रानात चरण्यासाठी सोडले होते. याचदरम्यान, शेतात पडलेल्या तुटलेल्या विजेच्या तारेचा जोरदार धक्का एका बैलाला बसला. धक्क्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.

 

सुदैवाने शेतकरी व इतर जनावरे वेळेवर सावध झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, बैलाच्या मृत्यूमुळे शिंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

गावकऱ्यांनी विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत टाकून देण्याबाबत महावितरणकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!