राजगड प्रतिनिधी : राजेंद्र रणखांबे
राजगड तालुक्यातील वेल्हे तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची माघार प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण सहा जागांसाठी आता २८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या या टप्प्यात तब्बल २६ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील मोठ्या संख्येने उमेदवारी दाखल केली होती. मात्र, माघार प्रक्रियेनंतर आता प्रत्यक्ष निवडणूक लढत कोणाकोणामध्ये होणार, हे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद वेल्हे ‘बु.’ गटातून माघार घेतलेले उमेदवार
शंकर कृष्णा रेणुसे, शंकर गुंडाजी भुरुक, संतोष तुकाराम रेणुसे, संदीप लहु खुटवड, सागर तानाजी मांगडे, रेवन्नाथ कृष्णाजी दारवटकर, रमेश राघु शिंदे, संगिता प्रकाश जेधे, प्रतिक्षा सचिन शिंदे, छाया शंकर गोरड, अशोक विष्णु सरपाले, अशोक शंकर चोरघे, अभिषेक संतोष वैराट.
जिल्हा परिषद विंझर गटातून माघार घेतलेले उमेदवार
भगवान पासलकर, उल्हास रेवन्नाथ दारवटकर, अभिषेक शिवाजी शेंडकर, तुषार जावळकर, विनायक दशरथ लिम्हण, भाग्यश्री रमेश मरगळे, किर्ती संजय देशमुख, मेघा संपत मोरे, ज्योती अनंता राऊत, वैशाली अविनाश कडू आदी उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
माघार प्रक्रियेनंतर उरलेल्या उमेदवारांमध्ये प्रचाराला वेग आला असून, गावोगावी बैठका, प्रचारफेऱ्या व जाहीर सभा सुरू झाल्या आहेत. स्थानिक विकास, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी आहेत.
आता मतदानाच्या दिवशी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण वेल्हे तालुक्याचे लक्ष लागले असून निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.







