आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

तानाजी मालुसरे विद्यालय दापोडेचे चित्रकला परीक्षेत घवघवीत यश; निकाल १०० टक्के!


विंझर | प्रतिनिधी

समीर कांबळे

राजगड ज्ञानपीठ संचलित, दापोडे येथील तानाजी मालुसरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखा कला (एलिमेंट्री व इंटरमिजिएट) परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या या घवघवीत कामगिरीमुळे विद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवणे, हे विद्यालयाचे नेहमीच प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना शालाबाह्य परीक्षा, स्पर्धा, कला उपक्रम यामध्ये सहभागी करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यालय सातत्याने प्रयत्नशील असते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना बाह्य जगाची ओळख होतेच, शिवाय आपली कला सादर करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधीही मिळते.

 

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाजीराव पवार सर म्हणाले,

“आमचे विद्यालय विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. या प्रेरणेतूनच आमच्या विद्यार्थ्यांनी आजवर तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.”

 

या यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक श्री. विशाल दळवी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध सरावामुळे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश शक्य झाले असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 

या उल्लेखनीय यशाबद्दल राजगड ज्ञानपीठ संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालकवर्ग तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले असून, पुढील काळातही अशाच प्रकारे विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!