आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

पांडे गावात ‘गणेश तात्या निगडे युवा चषक २०२५’चा भव्य जल्लोष क्रीडा, तरुणाई आणि सामाजिक बांधिलकीतून पंचायत समितीच्या दिशेने ठाम पाऊल


नसरापूर प्रतिनिधी : शिवम शिळीमकर

ग्रामीण भागातील तरुणांना खेळाच्या माध्यमातून संधी मिळावी, संघभावना निर्माण व्हावी आणि युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने गणेश (तात्या) निगडे यांनी स्वतःच्या स्वखर्चाने ‘गणेश तात्या निगडे युवा चषक २०२५’ या भव्य डे-नाईट फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोणत्याही संस्था किंवा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नव्हे, तर पूर्णपणे वैयक्तिक पुढाकारातून उभा राहिलेला हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

 

ही स्पर्धा शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ ते मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्रीमंत श्री काळभैरवनाथ क्रिकेट ग्राउंड, पांडे (ता. भोर, जि. पुणे) येथे पार पडणार आहे. पंचायत समिती गण भोंगवली (भोर पूर्व भाग) मधील सर्व संघांचा सहभाग या स्पर्धेत असणार असून, सर्व संघांची प्रवेश फी, टी-शर्ट व ट्रॅक पॅन्ट (किट) यांचा संपूर्ण खर्च गणेश तात्या निगडे यांनी स्वतः उचलला आहे. त्यामुळे कोणत्याही संघाकडून प्रवेश फी आकारली जाणार नाही.

 

स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून,

प्रथम क्रमांकास ४१,००१ रुपये,

द्वितीय क्रमांकास ३१,००१ रुपये,

तृतीय क्रमांकास २१,००१ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासोबतच बेस्ट बॉलर, सर्वोत्तम बॅटस्मन, सर्वोत्तम फिल्डर, बेस्ट यष्टीरक्षक, नवोदित खेळाडू व मॅन ऑफ द सिरीज यांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणून लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून, उपस्थित प्रेक्षकांमधून भाग्यवान विजेत्यास ३२ इंची एलईडी टीव्ही देण्यात येणार आहे. लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठीचे कुपन फक्त मैदानावरच उपलब्ध असतील.

 

ही स्पर्धा ८ षटकांची, हाफ लिग पद्धतीने खेळवली जाणार असून, गुरु लेझर टेनिस बॉल वापरण्यात येणार आहे. सर्व सामने युट्यूब लाईव्हद्वारे प्रसारित केले जाणार असून, दररोज दुपारी १ वाजता सामने सुरू होतील. उशिरा येणाऱ्या संघासाठी १ ओव्हरची पेनल्टी लागू राहील.

 

ग्रामीण तरुणांसाठी स्वतःच्या खर्चातून, कोणत्याही राजकीय मंचाविना उभारलेला हा क्रीडा उपक्रम गणेश तात्या निगडे यांच्या सामाजिक जाणिवेचे, नेतृत्वक्षमतेचे आणि जनसंपर्कातील विश्वासाचे प्रतीक ठरत आहे. क्रीडा, युवक आणि समाजहित या माध्यमातून उभा राहणारा हा उपक्रम पंचायत समिती पातळीवरील जबाबदारीकडे वाटचाल करणाऱ्या नेतृत्वाची स्पष्ट चाहूल देणारा असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!