आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

नसरापूरच्या वैष्णवी ताकवलेची भारतीय हवाई दलात गरुडझेप; जिद्द आणि चिकाटीचे प्रेरणादायी यश


प्रतिनिधी : शिवम शिळीमकर नसरापूर 

नसरापूर येथील वैष्णवी राजेंद्र ताकवले हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि न डगमगणाऱ्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीय हवाई दलात (Indian Airforce) Y Group मध्ये यश संपादन करत परिसराचा अभिमान वाढवला आहे. दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी ती Indian Airforce Y Group साठी अंतिमतः उत्तीर्ण झाली असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

मूळ गाव धनकवडी (ता. पुरंदर) असलेल्या आणि सध्या नसरापूर येथे वास्तव्यास असलेल्या वैष्णवीने आपले शालेय शिक्षण विजय मुकूंद आठवले विद्यालयातून पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत तिने ७८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होत शैक्षणिक वाटचालीची भक्कम सुरुवात केली. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण गरूड झेप करिअर अकॅडमी येथे घेतले. बारावीच्या परीक्षेत तिने ८२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

 

वैष्णवीचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहेत. साध्या कुटुंबातून आलेल्या वैष्णवीने लहानपणापासून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले होते. बारावीनंतर तिने Indian Navy मध्ये जाण्याचा निर्णय घेतला; मात्र त्या प्रयत्नात तिला अपयश आले. त्यानंतर तिने Indian Airforce ची परीक्षा दिली. पहिल्या टप्प्यात ती उत्तीर्ण झाली, मात्र दुसऱ्या टप्प्यात अपयश आले. या अपयशामुळे खचून न जाता तिने पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू ठेवली.

 

सततचा सराव, शिस्तबद्ध अभ्यास आणि कुटुंबीयांचा आधार यामुळे अखेर तिला यश मिळाले. ८ डिसेंबर २०२५ रोजी Indian Airforce Y Group मध्ये तिची निवड झाली. वैष्णवीच्या या यशामुळे नसरापूर व धनकवडी परिसरात आनंदाचे वातावरण असून अनेक युवक-युवतींसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!