विंझर प्रतिनिधी समीर कांबळे
वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात लाईट गेल्यावर वैद्यकीय उपचारांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राजगड (वेल्हे) तालुका यांच्या वतीने रुग्णालयास जनरेटरसाठी नवीन बॅटरी भेट देण्यात आली. ‘मदत नव्हे, कर्तव्य’ या सकारात्मक भूमिकेतून हा उपक्रम लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पार पडला.
रुग्णालयातील डॉक्टरांनी लाईट जाण्याच्या वेळेस येणाऱ्या उपचारातील समस्यांची माहिती दिल्यानंतर, पै. गोरक्ष शंकरराव भुरूक यांच्या विशेष सहकार्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय
घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), राजगड (वेल्हे) तालुका पक्षाचे अध्यक्ष मा. शंकरनाना भुरूक यांच्या उपस्थितीत ही बॅटरी डॉ. हिरास आणि डॉ. शिवाजी कुरणंकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी बोलताना, मा. शंकरनाना भुरूक यांनी सांगितले की, “जनप्रतिनिधी म्हणून समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे. रुग्णालयातील सेवा खंडित होऊ नये, यासाठी हा छोटासा हातभार आहे.”

या सामाजिक उपक्रमावेळी पानशेत विभाग अध्यक्ष मा. संपतशेठ मोरे, ओबीसी अध्यक्ष मा. लक्ष्मण तावरे, मा. हनुमंत कार्ले, मा. बाळासाहेब बोडके, मा. मायाभाई सणस, मा. मनोज भुरूक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या वेळेवर केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.










