अॅग्रोव्हिजन 2025 मध्ये मधमाशीपालनावर विशेष उपक्रम; ‘Indian Natural Honeybees – 2026’ कॅलेंडरचे लोकार्पण
नागपूरमध्ये 21 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान सुरू असलेल्या अॅग्रोव्हिजन 2025 या कृषी महोत्सवात यंदा शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात Scientific Beekeeping – National Bee Board, हैदराबाद यांच्या वतीने मधमाशीपालनाबाबत विशेष माहितीपर उपक्रम घेण्यात आला.
21 नोव्हेंबर रोजी केंद्रीय दळणवळण आणि रस्ते विकास मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते ‘Indian Natural Honeybees – 2026’ हे कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी श्री अशुतोष मुरकुटे, श्रीकांत शर्मा, तसेच शिरीष कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात “Honeybees: Importance for Food Security in Farming” या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. मधमाश्यांचे परागीभवन, पिकांच्या उत्पादनवाढीतील त्यांचे योगदान, पर्यावरणीय संतुलन आणि शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. वैज्ञानिक मधमाशीपालनाद्वारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक संधींचाही या सत्रात आढावा घेण्यात आला.
अॅग्रोव्हिजन 2025 मध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, शेतकरी व संशोधकांची मोठी उपस्थिती दिसून आली असून कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.






