आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

श्रीरामनगरमध्ये मोटार रिपेअरिंग दुकानातून लाखोंचा कॉपर माल चोरी


प्रतिनिधी विलास धोंगडे नसरापूर

श्रीरामनगर (बांडेवाडी), ता. हवेली — परिसरातील मोटार रिपेअरिंग दुकानाला अज्ञात चोरट्यांनी फोडाफोड करून मोठा झटका दिला असून तब्बल ₹2,98,169 किमतीचा कॉपर साहित्य आणि इतर महत्त्वाचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दुकानमालक सोपान विठ्ठल कोंडे (वय 53, रा. कुसगाव, ता. भोर) यांनी याबाबत राजगड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

 

घटनेनुसार, दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजता दुकान लॉक करून गेले होते. दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता दुकान उघडले असता खिडकीचे लोखंडी ग्रील धारदार साधनाने कापलेले दिसले. दुकानातील रॅक, कपाट, बॅरल आणि काउंटरमधील मौल्यवान कॉपर साहित्य पूर्णपणे गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरीची घटना स्पष्ट झाली.

 

चोरट्याने खालील माल चोरून नेल्याची नोंद आहे —

 

122 किलो कॉपर वायर — ₹1,00,868

 

56.034 किलो कॉपर बुश — ₹49,888

 

36 तुकडे कॉपर बुश — ₹7,900

 

बॅरलमधील स्क्रॅप कॉपर वायर — ₹1,00,805

 

100 मीटर सबमर्सिबल वायर — ₹9,096

 

गणमीटर बुश — ₹8,000

 

SKF बेअरिंग — ₹21,612

 

 

एकूण किंमत ₹2,98,169 इतकी असल्याचे पोलिसांनी पुष्टी केली आहे.

 

पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला असून चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. कापलेला ग्रील, आतमध्ये उचकापाचक, मालाची निवड करून चोरी, तसेच वजनदार साहित्य नेण्यासाठी वाहनाचा वापर झाल्याची शक्यता तपासात दिसत आहे.

 

परिसरातील CCTV फुटेज, स्क्रॅप दुकाने, कॉपर मटेरियल खरेदी-विक्री करणाऱ्या ठिकाणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुकानाजवळील हालचाली, संशयास्पद व्यक्ती, रात्रीच्या वेळेत झालेल्या फिरतीचा मागोवा घेण्याचे प्रयत्न पोलिसांनी वाढवले आहेत.

 

दाखल प्रक्रिया पोहवा 1860 कोल्हे यांनी पूर्ण केली असून सपोनि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ देण्याचे आवाहन केले आहे.

 

या चोरीच्या घटनेमुळे श्रीरामनगर परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेची अतिरिक्त पावले उचलण्याची मागणी होत आहे.


  • 👍
105
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!