आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

डावरगाव देवी येथे युनायटेड ग्लोबल फेडरेशनतर्फे शालेय दप्तरे वाटप उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, शिक्षणाची नवी प्रेरणा


डावरगाव देवी – सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक प्रोत्साहन यांचा सुंदर मिलाफ घडवत युनायटेड ग्लोबल फेडरेशन मार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “3000+ स्कूल बॅग वितरण उपक्रम” अंतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डावरगाव देवी येथे इयत्ता 1 ते 5 वीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगा वाटप करण्यात आले.

 

या उपक्रमामुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. नव्या दप्तरांनी शाळा परिसर उत्साहाने गजबजून गेला.

 

कार्यक्रमास युनायटेड ग्लोबल फेडरेशनचे चेअरमन दुर्गेश बनकर, तसेच ज्ञानेश्वर शास्त्री सुसार, मुकेश माकोडे, भागवत लोखंडे, वैभव लाखोले, उमेश गिराम, नारायण नवले, आकाश नवले, समाधान नवले, कुलदीप नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

चेअरमन दुर्गेश बनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

ते म्हणाले, “गावातील प्रत्येक मुलाने मोठी स्वप्ने पाहावीत. शिक्षण हीच खरी शक्ती आहे. मनापासून अभ्यास करा, भविष्य नक्की उज्ज्वल होईल.” त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली.

 

या सामाजिक उपक्रमाचे गावातील पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी मनःपूर्वक कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!