आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

दिडघर परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत संतोष लोळे यांचा मृत्यू नसरापूर–वेल्हा मार्गावर दुर्दैवी अपघात; राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


भोर, दि. 11 : विलास धोंगडे

भोर तालुक्यातील दिडघर परिसरात नसरापूर–वेल्हा मार्गावर एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत संतोष बापुसाहेब लोळे (वय 43, रा. सांगवी ब्रु, पोस्ट आंबवणे, ता. भोर) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

फिर्यादी गोविंद बाजीराव लोळे (वय 31, व्यवसाय – शेती, रा. सांगवी ब्रु, ता. भोर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9.30 वाजल्यापासून ते 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत दरम्यान, दिडघर ते माळेगाव मार्गावरील डांबरी रस्त्याच्या कडेला गवतात हा अपघात घडला.

संतोष लोळे हे आपल्या शाईन मोटारसायकलवर (क्र. एमएच 12 एलएन 5744) घरी परतत असताना अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगात व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर संबंधित वाहनचालकाने अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!