आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

पूर्व भागात नव्या वैभवाची चाहूल! पत्रकार वैभव धाडवे यांचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश; “संधीचं सोनं करून विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार”


भोर नसरापूर (प्रतिनिधी) – विलास धोंगडे

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न थेट सत्तेच्या दारात नेणारे आणि पूर्व भागातील युवकांना उद्योजकतेकडे वळवणारे नाव म्हणजे पत्रकार वैभव धाडवे. आता या सामाजिक भान असलेल्या पत्रकाराने थेट जनतेच्या विकासासाठी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये प्रवेश करून, विकासाच्या नव्या पर्वाची घोषणा केली.

“संधीचं सोनं करून तरुण उद्योजक तयार करायचे आणि पूर्व भागाला पुन्हा वैभव प्राप्त करून द्यायचं,” असा ठाम निर्धार धाडवे यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केला.

पत्रकार ते जननेते – प्रेरणादायी प्रवास

पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना धाडवे यांनी ‘मी उद्योजक होणार’ ही हजारो पुस्तके तरुणांपर्यंत पोहोचवली. युवकांना मार्गदर्शनपर शिबिरे, प्रशिक्षण कार्यशाळा आणि प्रेरणादायी व्याख्याने देत त्यांनी अनेक तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळवले. शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी निडरपणे मांडले. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत स्थानिक कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत धाडवे यांना उमेदवारीसाठी पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे.

“अजूनही टँकरवर गावं, रस्ते खड्ड्यांनी भरलेले”

भोर तालुक्यातील बिकट परिस्थितीवर भाष्य करताना धाडवे म्हणाले, “आजही अनेक गावांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. रस्ते हे विकासाचं प्रतीक असतात, पण आपल्या भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. जिल्हा परिषद शाळांना आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. शिक्षण, आरोग्य आणि कृषी विकासासाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची वेळ आली आहे.”

आगामी निवडणुकीत नवी समीकरणे

धाडवे यांच्या पक्षप्रवेशामुळे भोर तालुक्यातील राजकारणात नवीन समीकरणांची निर्मिती होण्याची चिन्हं आहेत. युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या धाडवे यांच्या विकासनिष्ठ भूमिकेमुळे इतर उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष विजय कोलते, तालुकाध्यक्ष रविंद्र बांदल, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैभव धाडवे यांचा पक्षप्रवेश हा केवळ राजकीय घटना नाही, तर पत्रकारितेतून राजकारणात उतरलेल्या सामाजिक जबाबदारीची नवी दिशा आहे. पूर्व भागाच्या विकासासाठी त्यांचा ‘पोटतिडकीचा’ दृष्टिकोन आणि ‘संधीचं सोनं’ करण्याची भूमिका, ग्रामीण राजकारणात नवचैतन्य आणू शकते


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!