आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

“युवाशक्तीचा नवा निर्धार! सूरज (बंटी) जगताप नसरापूर गणातून मैदानात”


प्रतिनिधी : विलास धोंगडे नसरापूर

भोर तालुक्यातील युवासेनेचे कार्यक्षम, जनसंपर्कात पारंगत आणि समाजकार्याची ओळख असलेले सूरज (बंटी) हनुमंत जगताप यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत नसरापूर गणातून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक तरुणांमध्ये नव्या उत्साहाची लाट उसळली आहे.

गेल्या काही वर्षांपासून गावातील विकासकामांमध्ये सातत्याने कार्यरत असलेल्या जगताप यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन, पीएमआरडीए घरकुल योजना राबविण्याचे प्रयत्न, तसेच गावातील रस्ते, पाणी आणि शैक्षणिक सोयीसुविधा सुधारण्यासाठी केलेले योगदान यामुळे लोकांमध्ये विश्वासार्ह कार्यकर्ता म्हणून स्थान मिळवले आहे.

कोरोना काळात ‘ग्रामदूत’ म्हणून जबाबदारी पार पाडत, त्यांनी नागरिकांना आवश्यक औषधे, अन्नधान्य व सेवा पुरवण्याचे काम केले. शिक्षणाबाबत संवेदनशील भूमिका घेत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षणाची गती कायम ठेवली.

सामाजिक कार्यासोबतच युवकांच्या रोजगार, क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी तरुणांना समाजकारणात सहभागी करून घेतले आहे. त्यांच्या या उपक्रमांमुळे आज नसरापूर परिसरात युवाशक्तीचा आवाज अधिक ठामपणे उमटू लागला आहे.

नसरापूर गणातील जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन जगताप यांनी स्थानिक स्वराज्यात तरुणाईचा आवाज पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर नसरापूर गणात नवा उत्साह, नव्या दिशेचा विश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.


  • 👍
106
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!