आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

रोखपालाच्या प्रामाणिकपणामुळे ग्रामपंचायतीला जादा रक्कम परत


विंझर प्रतिनिधी राजेंद्र रणखांबे 

राजगड तालुक्यातील साखर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील रोखपाल अमोल रेणुसे यांच्या प्रामाणिकपणामुळे ग्रामपंचायतीची जादा भरलेली रक्कम तात्काळ परत मिळाली.

 

मार्गासनी ग्रामपंचायतीचे लिपिक गणेश यादव हे घरपट्टीचे पैसे भरण्यासाठी बँकेत आले असता, चुकून २०,७०० रुपये (वीस हजार सातशे) अधिक रक्कम जमा झाली. ही बाब लक्षात येताच रोखपाल अमोल रेणुसे यांनी प्रामाणिकपणा दाखवत ती जादा रक्कम तत्काळ ग्रामपंचायतीकडे परत केली.

 

या प्रसंगी शाखा व्यवस्थापक विकास कुमठे, ग्रामसेवक यादव, सरपंच शंकर रेणुसे, लेखनिक राजेंद्र रांजणे तसेच कनिष्ठ सेवक समीर मालुसरे व राहुल रसाळ उपस्थित होते.

रोखपाल अमोल रेणुसे यांच्या या स्तुत्य कृतीबद्दल बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर आणि निर्मला जागडे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

 

सार्वजनिक व्यवहारात पारदर्शकता व प्रामाणिकपणाचे हे उदाहरण ठरावे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!