शंकरराव भेलके कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. अनुजा वाल्हेकर, कु. पौर्णिमा गोळे, यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. मराठी विभाग प्रमुख डॉ.शेवते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा सर्वांसमोर ठेवला. इतिहास विभाग प्रमुख प्रा. सहदेव रोडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वास्तविक जीवनावर ऐतिहासिक प्रकाश टाकला. हिंदी विभाग प्रमुख डॉ.गणपत आवटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणातील योगदान सर्वांसमोर ठेवले. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संदीप लांडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासावर भाष्य केले.
आपल्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भारतीय स्त्रियांच्या सुधारनेतील कर्तव्यनिष्ठा सांगून समाजामध्ये स्त्री शिक्षण किती महत्वाचे आहे हे अधोरेखित करून समाजातील तळागाळातील सर्व स्त्रिया शिक्षित झाल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डीचे ग्रंथपाल प्रा.अंकुश जाधव आणि त्यांचे सहकारी मित्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, डॉ.रोहिदास ढाकणे, प्रा.पौर्णिमा कारळे, ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.जाधवर दयानंद, प्रा. माऊली कोंडे, प्रा.महेश कोळपे, प्रा.अंकिता महांगरे, विकास ताकवले, सीमा देशमुख, मनीषा मोहिते, सुमित कांबळे, अभिषेक मोरे, धनाजी माने इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन प्रा संदीप लांडगे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा.जीवन गायकवाड यांनी मानले.








