आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

कवयित्री डॉ. कीर्ती जाधव यांची बा. सी. मर्ढेकर कविकट्ट्यावर काव्यप्रस्तुती


खडकवासला–सातारा येथे संपन्न होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ कवयित्री डॉ. कीर्ती जाधव यांनी बा. सी. मर्ढेकर कविकट्टा काव्यमंचावर आपल्या कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फाउंडेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

डॉ. कीर्ती जाधव यांनी आपल्या ‘आयाम’ या कवितेचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या कवितेतील भावस्पर्शी आशय, सूक्ष्म संवेदनशीलता आणि शब्दांची ताकद यामुळे उपस्थित रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत कवयित्रीच्या सादरीकरणाचे स्वागत करण्यात आले.

 

या कविकट्ट्याचे अध्यक्ष राजन लाखे, नितीन तारळकर, जे. जे. कुलकर्णी यांच्यासह अनेक साहित्यिक व मान्यवर या वेळी उपस्थित होते. कविकट्ट्यावर उत्कृष्ट काव्यप्रस्तुती केल्याबद्दल डॉ. कीर्ती जाधव यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी बोलताना डॉ. जाधव यांनी बा. सी. मर्ढेकर कविकट्टा काव्यमंचावर कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.

 

डॉ. कीर्ती जाधव यांचा ‘क्षण गुंफलेले’ हा कवितासंग्रह आणि ‘कोवळी उन्हे’ हा चारोळी संग्रह यापूर्वीच प्रसिद्ध झाला असून त्यांना साहित्यविश्वात चांगली ओळख मिळाली आहे. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक तसेच मासिकांमधून त्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि विविध विषयांवरील लेखन व कविता नियमितपणे प्रकाशित होत असतात.

 

सध्या डॉ. कीर्ती जाधव या खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यवसाय अभ्यासक्रम विभागात पूर्णवेळ शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानामुळे आणि काव्यसाधनेमुळे साहित्यप्रेमींमध्ये त्यांचे विशेष स्थान निर्माण झाले आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!