
ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू राज्यात २०२६ मधील ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; महत्वाच्या तारखा निश्चित
मुंबई : राज्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रशासकीय प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे.