
आठवले विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांच्या ‘नवे क्षितिज’ काव्यसंग्रहाचे निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
माळेगाव (ता. भोर) : ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था, नसरापूर संचलित विजय मुकुंद आठवले माध्यमिक विद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.